उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील बसस्थानकात सर्वत्र पावसाच्या पाण्याने चिखल झालेले असून, पावसाचे पाणी पसरलेले आहे. प्रवाशाचे हाल होत आहे. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील दुय्यम दर्जाचा तालुका आहे. या भागातून महाराष्ट्र आंध्र कर्नाटक या तीन राज्यात दररोज बसेस ये जा करतात. हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. उदगीर हा तालुका सीमा भागावर असून, जिल्हा होण्याच्या प्रयत्नात आहे. अशा ठिकाणी प्रवाशांना बस स्थानक नसल्यामुळे, पावसाच्या पाण्याच्या व चिखलाच्या भागातून दररोज प्रवास करावा लागत आहे. उदगीरच्या जनतेत याबद्दल नाराजी असून चीड निर्माण झालेली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजयजी बनसोडे यांच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रार पण केलेली आहे. तरी त्यांचे दुर्लक्ष होत आहे. लवकरात लवकर बस आगार प्रमुख यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून या भागाची सुधारणा करावी, अशी नागरिकाची सर्वत्र मागणी होत आहे. जर वेळेवर या भागाची सुधारणा नाही केल्यास, नागरिक हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
