उदगीर (एल.पी.उगीले)
सीमा भागातील दापका परिसर अर्थात बिदर जिल्ह्यातील कमालनगर तालुक्यातील गंगनबीड येथील उत्कृष्ट आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित झालेले अंकुश लक्ष्मणराव वाडीकर यांच्या शेतातील नवीन शेततळे पूर्ण झाले आहे. त्याची पाणी व पूजन करण्यासाठी जिल्हाचे फलोत्पादन अधिकारी विश्वनाथ झिल्ळे व तालुका फलोत्पादन कृषी अधिकारी सौ. लक्ष्मी माॅडम यांनी गंगनबिड येथे बळीराजा कृषी सेवा संघ यांच्यामार्फत केली आहे. या शेततळ्याची लांबी, रुंदी आणि खोली दीडशे बाय दीडशे व सात मीटर पाण्याच्या साठवण्याची क्षमता साठ लाख लिटर आहे. अधिकाऱ्यांनी याचे छायाचित्रण केले. जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी पाहणी करून तळ्याचे काम पूर्ण झालेले आहे, याची खात्री केली. आणि त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्याचवेळी केसर आंब्याचे लागवड जिल्हा कृषी व तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. अशा या माळरानामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी केलेले प्रयोग व झाड लावण्यासाठी केलेला नवीन प्रयोग हे पाहून जिल्हा कृषी अधिकारी हे सुद्धा आश्चर्य चकित झाले. उत्कृष्ट प्रगतशील जिल्हास्तरीय पुरस्कार संपादन केलेले अंकुश वाडीकर यांनी शेतीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घेतलेले काम पूर्ण करतात आणि आपल्या शेतीमध्ये नावीन्यपूर्णता प्रयोग स्वतः राबवतात, आपले उद्दिष्ट पूर्ण करतात. हे जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी याप्रसंगी सांगितले. दापका फलोत्पादन अधिकारी आणि ठाणा कुसनूर सर्कल उत्पादन अधिकारी अण्णाराव पाटील, बस्वकल्याणचे अनेक शेतकरी, संजय मुर्के चिखली, लक्ष्मण वाडीकर, गोविंद वाडीकर, धनराज वाडिकर, वेंकट वाडीकर, लव्हू वाडीकर, दिगंबर वाडीकर यांच्यासह अन्य बरेच शेतकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
