उदगीर (प्रतिनिधी) उदगीर ते औराद जाणारा भवानी दापका या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे, वाहतुकीला व रहदारीला अडथळा निर्माण झालेला आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे खड्डे भरलेले दिसून येत आहेत. खड्ड्यात पाणी किंवा पाण्यात खड्डा असलेला नागरिकांना दिसून येत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या भागातील ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव यांनी बरेच वेळा शासन दरबारी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीची अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. या भागातील निवडून आलेले आमदार व खासदार यांच्याकडे पण अनेक वेळा तक्रार दाखल केलेली आहे. त्यांनी पण अद्याप दखल घेतलेली नाही. प्रत्येक नागरिकांना या रस्त्याने रहदारी करत असताना असंख्य अडचणीच सामना द्यावा लागत आहे. जर शासनाने याची दखल नाही घेतल्यास, या भागातील नागरिक शासनाच्या विरोधात आंदोलन व उपोषण करण्याच्या पावित्र्यात आहेत. म्हणून शासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.
