देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
उदगीर तालुक्यातील किनी यल्ला ग्रामीण गावचा गोरगरीब असणारा मुलगा यांच्या आई वडील मोजरी करून उच्चशिक्षित शिक्षण देऊन आज मुलाला अक्षरशः डोळ्यांनी पाहत आहेत डॉ विष्णू काबळे यांना व्यसनमुक्ती पुरस्कार ९ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यकर्ते व संस्थांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार 2024 देण्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, वाय. बी. सेंटर मंत्रालय समोर मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नशाबंदी मंडळाचे लातूर जिल्हा संघटक डॉ. विष्णू काळबा कांबळे यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार २०२४ निवड करण्यात आली.ते मागील पाच वर्षांपासून नशा बंदीचे काम लातूर जिल्ह्यात अविरतपणे करतात. शाळा, कॉलेज व समाज व्यसनमुक्त करण्यासाठी नशाबंदी प्रचार प्रसाराचे काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या नसाबंदीच्या कार्यासाठी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल मातंग बांधव, पत्रकार, सामाजिक संस्थेचे विविध संघटनेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, वकील, गावातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष,नातेवाईक व मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
