उदगीर (एल.पी.उगीले): देशात शांतता समृद्धी व सद्भावना नांदावी, म्हणून जमाअ़ते इस्लामी हिंद अनेक कार्यक्रम राबवत असते. यावर्षी वाढलेला उकाडा व पर्यावरणातील असमतोलपणा पाहून जमाअ़ते इस्लामी हिंद, महाराष्ट्र हे 'निरोगी पर्यावरण, आरोग्यदायी जीवन' या नावाने पंधरवाडा साजरा करीत आहेत. यानिमित्ताने शहरातील जळकोट रोड स्थित अल-अमीन अध्यापक विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या पंधरवड्या निमित्त जमाअ़ते इस्लामी हिंदच्या प्रत्येक सदस्याने किमान एक झाड लावणे, स्वतः प्लास्टिक बॅगचा वापर न करणे व इतरांनाही करू न देणे, शिवाय जल पुनर्भरण सारख्या उपक्रमाविषयी समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत.
नगर परिषदेच्या सहकार्याने जमाअते हिंद, उदगीर ने हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी शहरातील आनंदी ग्रुप, जिव्हाळा ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उदगीर शहराचे पोलीस निरीक्षक सोनकवडे, मुस्लिम युनायटेड फोरमचे अध्यक्ष मुजीब खतीब, व्यापारी प्रदीप बेद्रे, अनिसचे शहराध्यक्ष विजयकुमार पाटील, अल-अमीन एज्युकेशन संस्थेचे सचिव शेख अकबर, कुणाल बागबंदे, मुरलीधर जाधव, राम बिरादार, मुरलीधर जाधव, बिरादार माळेवाडी कर, जमाअ़ते इस्लामी हिंद, उदगीरचे शहराध्यक्ष दायमी अब्दुल रहीम, डॉ. शेख असग़र या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणानंतर छोटीसी बैठक पार पाडली. या बैठकीत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व यावर चर्चा झाली. वृक्षारोपणाविषयी पैगंबरी शिकवण व संतांचे मार्गदर्शन याविषयीही चर्चा झाली. उपस्थितांनी आपण नेहमी पर्यावरण संवर्धनाकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जमाअ़ते इस्लामी हिंदच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
