देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पंधरवाडा सप्ताह समाप्ती आणि महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय डॉक्टर वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच एक जुलै हा दिवस महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला.हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची जयंती आणि एक जुलै कृषि दिनानिमित्त बोंबळी बु.येथे आंबा वृक्ष तर दवणहिप्परगा येथे वन महोत्सव निमित्त मा.तहसिलदार श्री गजानन शिंदे,मा.तालुका कृषि अधिकारी श्री.एस.आर.पाटील,मंडळ कृषि अधिकारी श्री.बी.एम.जाधव यांच्या हस्ते वड,पिंपळ या वृक्षाची लागवड करण्यात आली.तसेच देवणी बु.येथे कृषि दिनानिमित्त मंडळ कृषि अधिकारी श्री.बी.एम.जाधव,कृषि पर्यवेक्षक श्री.बी.टी.सुर्यवंशी,कृषि सहाय्यक पी.बी.कारभारी,आर.जी.मोरे,पी.बी.कांबळे,एस.डी.इंगळे यांच्या हस्ते आंबा वृक्ष लागवड करण्यात आली.
.jpeg)