देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व शेतकरी संघटना व हेळंब, कवठाळ येथील शेतकऱ्यांच्या वतीने देवणी तहसीलदार साहेबांना गेल्या वर्षीचे सोयाबीन पिक विमा संदर्भ , व KYC करुन ही बडी ज्वारी चे नुकसान भरपाई चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही या संदर्भात आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार साहेबांनी ऊद्या ११ वाजता देवणी तहसील कार्यालय यैथे शेतकरी संघटना व शेतकरी, कृषी विभाग, विमा कंपनी यांची बैठक बोलावली आहे तरी देवणी तालुक्यातिल शेतकरी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थित रहावे हि शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवने व शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र काशीनाथ अंबुलगे रणजित अंभगराव सावंत यांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना विनंती.
नोट=शेतकरी बांधवांनी विमा संदर्भात आपले म्हणणे मांडण्याची हिच संधी आहे.
