उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे क्रिडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मधुमेह,रक्तदाब,दंत तपासणी उदागीर बाबा मठ संस्थान किल्ला येथे आयोजन केले होते.या शिबीराचे उद्घाटन किरण महाराज गिरी त्यांच्या हस्ते तर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या शिबीराचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग लातूर जिल्ह्यध्यक्ष अभिजीत औटे, अल्पसंख्यांक विभाग जिल्ह्यध्यक्ष शफी हाशमी, महिला जिल्ह्य कार्याध्यक्षा ग्रामीण अँड दिपाली औटे हे होते तर मधुर डायबेटिज सेंटर चे डाॅ.प्रशांत नवट्टके, टी 32 मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल प्रमुख डाॅ स्मिता वंजे, डाॅ प्रसाद गंगथडे हे प्रमुख तज्ञ डॉक्टर्स म्हणून उपस्थित होते.
या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, महिला तालुका अध्यक्षा उर्मिला वाघमारे, शहर अध्यक्षा मधुमती कनशेट्टे, चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग तालुका अध्यक्ष रतिकांत घोंगरे, शहर अध्यक्ष सय्यद सलीम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सदरील शिबीरात 700 भक्तांची मोफत तपासणी करण्यात आली. सदरील शिबीरात तपासनी डाॅ प्रशांत नवट्टके डाॅ स्मिता वंजे, डाॅ प्रसाद ग॓गथडे यांनी केली. मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी स्वप्निल फुलारी, बालाजी कुमठे यांनी केली.
