देवणी प्रतिनिधी-- लक्ष्मण रणदिवे
रास्त भाव दुकानदार यांच्या अनेक वर्षापासून च्या प्रलंबित मागण्याची पूर्तता शासनाकडून होत नसल्यामुळे देवणी तहसील कार्यालय समोर रास्त भाव दुकानदार संघटना देवणी तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन आंदोलन करण्यात आले.
नियमितपणे दर महिन्याच्या ५ तारखेचा आत मार्जिन ची रक्कम रास्त भाव दुकानदार यांच्या खात्यात जमा करावेत, स्वस्त धान्य दुकानातुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरणासाठी येत असल्यामुळे रास्त भाव दुकानदार यांना जनतेच्या रोषासमोर जावे लागत आहे. गुरांना जानावरांना सुद्धा खाण्यास योग्य प्रतीचे धान्य एक एक वेळेस येत नाही. स्वच्छ व चांगले प्रतीचे धान्य धान्य वितरणासाठी देण्यात यावेत. शेतकरी योजनेतील शासनाने बंद केलेले धान्य पूर्ववत चालू करण्यात यावे. रास्त भाव दुकानदार यांना धान्य मोजून ५० किलो ५०० ग्रॅम चे कट्टे झूट बारदाना मध्ये देण्यात यावे. राष्ट्रभा दुकानदार यांना प्रतिमा पन्नास हजार रुपये मानधन देण्यात यावे. तात्काळ रास्त भाव दुकानदार यांच्या सोबतच्या १० जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकी मध्ये राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ महोदयांनी आश्वासित केल्या प्रमाणे कमिशन मध्ये वाढ करण्यात यावे. प्रलंबित आरसी चे काम तात्काळ करावेत. या विविध मागण्यासाठी एक दिवशी धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात आले आहे. देवणी तालुक्यात सुद्धा एक दिवशी धरणे आंदोलन केल्याची माहिती या वेळी बोलताना रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन देशमुख यांनी सांगितले.यावेळी अंकुशभाऊ गायकवाड, भगवान सावंत महासचिव, दीपक वाघमारे, राम बिरादार, मनोहर लांडगे, रोहित पडसलगे, आर पी गोंडगावे, यु के मोरे माधव तेलंगे, तोंडारे जवळगा, हनुमंत मसगले, महादेव पत्री, अजय शिंदे, गोपाळ कारभारी, व्यंकट बिरादार सावरगाव, रामदास बनसोडे, बलभीम घोडके, अंकुश बागवाले, इत्यादी रास्त भाव दुकानदार देवणी तालुका सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते एक दिवशी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
