( देवणी )गट साधन केंद्र देवणी येथे कार्यरत आबासाहेब श्रीरंग भद्रे सर विषय साधनव्यक्ती यांचे चिरंजीव शिवकुमार भद्रे यांनी नीट NEET परीक्षेत 720 पैकी 685 गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त करून MBBS च्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरल्या बद्दल आपल्या सहकारी मित्राच्या मुलाचा आज माजी गट समयन्वयक तथा विळेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सुर्यकांत साखरे सर यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पेढा भरवून करण्यात आला. या वेळी उपस्थित वडील आबासाहेब भद्रे व आई सविता भद्रे यांचा ही या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाल, पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
या छोटेखानी कार्यक्रमाला गट साधन केंद्र येथील राजेंद्र वजनम, राजकुमार जाधव ,मुशीर दायमी, दिपक बोडके ,मिनहाज सिद्धीकी, श्रीरंग सुर्यवंशी, यास्मिन शेख ,एकनाथ यमगर,आनंद बिरादार अंतेश्वर चलवा सर इत्यादी उपस्थित होते.
सुर्यकांत साखरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच उपस्थित सर्वांकडून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा! देण्यात आले.
