देवणी प्रतिनिधी
देवणी येथे माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित चित्रपट संघर्ष योद्धा यातील कलाकार रोहन पाटील व जानवी तांबे यांच्या देवणी तालुक्यात आगमन झाले. यावेळी संकल मराठा समाज देवणी च्या वतीने चित्रपटाच्या प्रमोशन करण्यात आले. तसेच संकल मराठा समाज देवणी च्या वतीने रोहन पाटील यांचे स्वागत संकल मराठा समाजाचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णा इंगोले यांनी केले. व सर्व कार्यकर्ते यांचे स्वागत मराठा बांधवांनी केले. तसेच सर्वाना विनंती करण्यात आले. की सर्वांनी 14 जुन 2024 रोजी चित्रपट पाहण्यासाठी जावे. तसेच सर्व बांधवांना जनजागृती करावी असे अहवान करण्यात आले. या वेळी नामदेव मुराळे, कृष्णा इंगोले, मालबा घोणसे, संदीप पाटील, धनराज बिरादार, ज्ञानेश्वर शेंडगे, राहुल बालुरे, राजाराम पाटील, ज्ञानेश्वर भोसले संजय मुराळे, एकनाथ सावळे, अंबादास बागवाले, दिपक माने, रामभाऊ बिरादार, गोपाळ इंगोले, व देवणी तालुक्यातील संकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संकल मराठा समाज देवणी. एक मराठा लाख मराठा.
