देवणी प्रतिनिधी-- लक्ष्मण रणदिवे
देवणी -- देवणी तालुक्यात शेतकरी पेरणीला सुरुवात केली आहे मात्र कृषी विभाग कृषी विभागामार्फत सांगण्यात येत आहे की पेरणी करू नये शेतकरी ऐकत नाहीत शेतकरी राजा पेरणी मध्ये गुंग दिसत आहे, निवडणूक झाली. निकाल झाला. आता शेतकऱ्यांचे लक्ष फक्त आणि फक्त पावसाकडे आणि खरीप पेरणीकडे लागले आहे. मागील दिवसात देवणी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा चांगला सुखावला आहे. हा पाऊस तालुक्यात सर्वदूर झाल्याचे वृत्त आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या कृषिप्रधान देशामध्ये शेती ही खूप महत्त्वाची आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतीवर जनजीवन अवलंबून आहे. त्यामुळे मोठा पाऊस कधी पडेल आणि पेरण्या कधी होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लोकसभा निवडणुकीकडे लागले होते. रोज होणाऱ्या जाहीर सभा, आघाडी बिघाडीची चर्चा, कोण कुठल्या पक्षात जाणार, कोण कोणाबरोबर जातो. असे सगळे निवडणूकमय वातावरण मागच्या दोन महिन्यांपासून पाहायला मिळाले. ही देशाची निवडणूक असल्यामुळे सर्वजण यावेळी अतिशय सूक्ष्मरीत्या अभ्यास व निरीक्षण करत शेतकऱ्यांनी मतदान करत परिवर्तन केले. पण आता जून महिना उजाडलेला आहे.हा महिना पावसाळ्याचा असतो आणि एक प्रकारे आता खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे.
१५ जूनपर्यंत जोरदार पाऊस
कोसळेल, असा अंदाज आहे.या
पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरीसुद्धा पेरणीपूर्व तयारीला लागला आहे. गेल्या वर्षी म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता. उशिरा पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे देवणी तालुक्यात देखील अल्प पाणीसाठा होता. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.
तालुक्यातील पाणीटंचाई कमी होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. खरीप पेरण्या वेळेवर व्हाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणीटंचाई तालुक्यातील दूर व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. एकूणच काय तर आता निवडणुकीची चर्चा संपलेली आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष खरीप हंगामाच्या तयारीकडे आणि पावसाने तीन ते चार दिवसापासून देवणी तालुक्यावरून तोंड फिरवल्याने शेतकऱ्यांचे नजरा आभाळाकडे टिकून आहेत.
.jpeg)