मराठी माध्यम या विद्यालयामध्ये अतिशय सुंदर शिकवले जाते
सिमी इंग्रजी माध्यम सुरू झालेला आहे या विद्यालयात प्रवेश घ्यावा असे यशवंतराव पाटील यांनी सांगितले
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेत शाळेचा पहिला दिवस शाळेची सुरुवात ही चैतन्यमय व उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक व विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. त्याचाच एक भाग शाळा प्रवेशोत्सव-२०२४ जिल्हाधिकारी लातुर यांच्या संकल्पनेतून शाळेतील पहिलं पाऊल वृक्ष लावून या जिल्हाधिकारी लातुर यांच्या आवाहनाला प्रतिसाथ देवून पहिल्या वर्गात प्रवेश घेणार्या शाळेचा पहिला दिवस वृक्ष लावून करण्यात आला या नवीन वर्षात पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेले मुलाना फुल देऊन स्वागत करण्यात आले या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेतील पहिलं पाऊल वृक्ष लावून साजरा करण्यात आला तसेच शाळेतील सर्व मुलांना शालेय पुस्तके वाटप करण्यात आले या प्रसंगी यशवंतराव पाटील सचिव, अभिजीत पाटील, आदित्य पाटील, मुख्याध्यापक राजकुमार हरकंचे, शौकत शेख, माका सुशील, मलवाडे रामदास, हुमनाबादे नागनाथ, कस्तुरे रवींद्र, शंकर पाटील, आनंद घोणसे, तुळशीराम सूर्यवंशी, बिराजदार, श्याम वाघमारे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, प्रकाश कांबळे, यांची उपस्थिती होती. या शाळेत गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पुस्तके वाटप केली जाते अनेक विद्यार्थी उत्कृष्ट मार्गाने पास होतात या शाळेचा सर्व स्टाफ मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले जाते
