उदगीर (एल.पी.उगीले) येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३- २४ च्या पहिल्या दिवशी नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रवेशद्वार व फलक सुशोभित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंचावर स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे ,विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार, राजकुमार म्हेत्रे ,माधव मठवाले उपस्थित होते.
विद्यालयाच्या परिसरात शंकरराव लासुणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांनी मनोगत व्यक्त करताना पहिल्याच दिवशी उत्साहात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम प्रमुख आशा गौतम यांनी केले.
