उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दिनांक १५ जून २०२४ शनिवार रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसरात रांगोळ्या ,आंब्याच्या पानांचे तोरण बांधून ,सेल्फी पॉईंट, फुग्यांची कमान व वृक्ष पूजन करून तसेच,विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करुन उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रवेशद्वारापासून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे ढोल,ताशे वाजवत, फुलांचा वर्षाव करुन व औक्षण करून सर्व विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ व्हि.व्हि.सरवदे माजी उपायुक्त पशुसंवर्धन विभाग लातूर ,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष असल्याने प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरवदे यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कार रुजविण्याचे कार्य करीत असते.विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संस्कारक्षम व्हावे,असे मार्गदर्शन केले.
विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी चैतन्यमय वातावरणात शाळेत प्रवेशोत्सव साजरा करत आहोत.सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून घ्यावी.वाचनामुळे आपल्याला चौफेर ज्ञान मिळते.सर्वांना प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी मंगलमय वातावरणात शाळेची सुरुवात झालेली आहे.सर्व विद्यार्थ्यांनी शालेय उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी होऊन व अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे सांगून,सर्वांनी पहिले पाऊल वृक्ष लावून या जिल्हाधिकारी लातूर यांच्या संकल्पनेतून वृक्ष पूजन केले.सर्वानी जास्तीत जास्त झाडे लावून त्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले.सुत्रसंचलन सौ.दिपाली भावसार व सौ.भाग्यश्री स्वामी यांनी केले.
.jpeg)