उदगीर (एल.पी.उगीले)
अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ ने योग महाकुंम्भ २०२४ मध्ये "राममय से योग मय" असे ब्रिद घेऊन उत्तर प्रदेश येथील अयोध्या धाम च्या श्री रामलीला संस्कृतीक सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये योग क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा "महर्षी पतंजली योग रत्न" राष्ट्रीय पुरस्कार संदीप सखाराम पवार राष्ट्रीय पंच यांना प्रदान करण्यात आला आहे.
संदीप पवार हे राष्ट्रीय पंच व सखा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा कराटे आसोसिएशन व योग कल्चर आसोसिएशन , सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष , क्रीडा मार्गदर्शक आहेत. त्यानी सखा क्रीडा मंडळ च्या माध्यमातून विविध स्पर्धे मध्ये राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. शहर व ग्रामीण भागातील लोकांना मोफत योग प्रशिक्षण शिबिर घेऊन लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांना योग, प्राणायाम, ध्यान, व आरोग्य, आहार, स्वास्थ, सूर्यनमस्कार, योगासने यांचे महत्त्व गेल्या सोळा वर्षां पासुन सातत्याने अविरत चालू आहे. व योगासनांच्या स्पर्धा आयोजित करुन लहान मुलांनपासुन ते वयोवृद्ध, जेष्ठ व्यक्तीना ही स्पर्धेत सहभागी करून योगासनांची आवड निर्माण करण्याचे काम करत आहेत. योग शिक्षक महासंघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन योग शिबिर घेऊन योगाचे महत्त्व सांगुन प्रचार, प्रसार व समाजातील लोकांना निरोगी , सदृड बनवण्यासाठी अविरत समाज कार्य करत आहेत. राष्ट्रीय एकात्मता, योग प्रसार प्रचार, सशक्त भारत योग मय भारत घडवण्यासाठी योगदान देत असल्याने योग क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य केल्याने "महर्षी पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्काराने संदीप सखाराम पवार यांना बाली इंडोनेशिया आश्रम गांधी पूरी सेवाग्राम चे अध्यक्ष पद्मश्री अगुस इन्द्र उदयन, माजी उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा ,वेद मूर्ति पवन दत्त महराज, राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी यांनी पुरस्कार देउन सन्मानित केले.
