उदगीर (एल.पी. उगिले)
लातूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच खा. शिवाजीराव काळगे उदगीर शहरात जनतेला भेटून आभार व्यक्त करण्यासाठी आले असता, डॉक्टर जाकिर हुसेन चौक (उमा चौक) येथे राष्ट्रीय दलित अधिकार मंच, भारतीय दलित पॅंथर यांच्या वतीने संयोजक निवृत्तीराव सांगवे यांनी भव्य दिव्य स्वागत करताना जेसीबीतून फुलांची उधळण केली. तसेच विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टिपू सुलतान इत्यादी महापुरुषांच्या प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी नावंदे महाराज, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा काँग्रेस पक्षाचे उदगीर विधानसभा मतदारसंघ प्रभारी रविंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाउपाध्यक्ष व्यंकटराव पाटील अव्वलकोंडेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजीम दायमी, संभाजी तिकटे, मुकरम जागीरदार, प्रकाश मसुरे, आयाज जागीरदार, सुनील चव्हाण, सुमित वाघमारे, विकास कांबळे,नाना ढगे, श्रीकांत पाटील, अमोल घुमाडे, प्रा.गोविंदराव भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेकडून व्यक्त होत असलेल्या प्रेमाबद्दल खा. शिवाजीराव काळगे यांनी ऋण व्यक्त केले. निवडणुकीच्या अगोदर ज्या ज्या गोष्टीच्या आश्वासन दिले होते, विकासाच्या प्रश्नाच्या संदर्भात जे वचन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. असे आश्वासनही याप्रसंगी शिवाजीराव काळगे यांनी दिले.
अल्पावधीत राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि भारतीय दलित पॅंथर च्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार आणि स्वागत केल्याबद्दल त्यांनी विशेष आभारही व्यक्त केले.
