उदगीर: येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक तथा विभाग प्रमुख सुधाकर पोलावार हे अध्यक्ष म्हणून लाभले होते व प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे तर, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या महान कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात सुधाकर पोलावार यांनी विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांविषयीचे साहित्य मिळवून वाचावे व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक आदर्श नागरिक बनावे असे आवाहन केले.
सूत्रसंचलन सौ.देवकी काळे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता शांती मंत्रांनी झाली.
