उदगीर(एल. पी.उगीले) ,छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास या योजनेअंतर्गत उदगीर तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचे कार्य सतिश उस्तुरे यांच्या सि -डँक कम्प्युटर्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे . विद्यार्थ्यांनी वीर बाजी पासलकर, या योजनेतून संगणक शिकता शिकता कमवा या संकल्पनेतून आपल्या पहिल्या कमाईतून आई-वडिलांसाठी भेटवस्तू घेतली होती . मुलांचे कौतुक अभिनंदन करत तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते मुलांनी पहील्या कमाईतून घेतलेल्या साडी व कपडे मुलांच्या आईंना देण्यात आले . सारथीच्या कमवा व शिका या योजनेअंतर्गत शासनाकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्य जोरावर विद्यार्थ्यांनी स्वतः कमाई करत आई आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत आहेत सारथीच्या उपक्रमाच्या मार्फत उदगीरच्या सी डॅक कॅम्प्युटर्स मधून अनेक विद्यार्थी कौशल्य प्राप्त करत आहेत या कौशल्याचा उपयोग स्वतःच्या रोजगार निर्मिती साठी होत आहे अनेक विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्याचा उपयोग करत स्वतः कमाई केली होती या कमायातून कमाईतून आपल्या आई-वडिलांना कपडे व भेट दिली गेली याचा मनस्वी आनंदही आई-वडिलांना होत असल्याचे सांगितले
यावेळी बिरादार श्रीरंग हरिदास
बिरादार यांने आई मंजुळा हरिदास बिरादार यांना ,
शिंदे कल्पना शिवकुमार यांना शिंदे अभिषेक या मुलाने पहिल्या कमाईतून कपडे घेऊन दिले.
प्रतिक्रिया
सारथीच्या वीर बाजी पासलकर कौशल्य विकास या योजनेअंतर्गत उदगीर येथील सी डॅक कॅम्प्युटरच्या माध्यमातून मुलांनी संगणकाचे कौशल्य प्राप्त केले व पहिल्या कमाईतून आई वडिलांना कपडे भेट दिले याचा मनस्वी आनंद झाला आहे
कल्पना शिंदे पालक
