मानवी हक्क अभियानानी घेतली दख्खल,विद्युत उप अभियंत्यांस संघटनेचे निवेदन.
लातुर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या जगळपुर गावातील शेतकरी रामदास माधवराव कदम यांची मालकी शेती गट क्रं.८६ मध्ये विद्युत लाईनचे तिन मुख्य पोल पडले असुन यामुळे शेतकऱ्यांची मात्र पेरणी खोळंबली आहे,पोल पडुन पंधरा उलटला असुन विद्युत यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे,याबाबद शेतकरी रामदास कदम यांनी संबंधित लाईन मैन ला माहीती देऊनही त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे,या त्रस्त शेतकऱ्यांनी मानवी हक्क अभियानानी जळकोट च्या विद्युत उप अभियंत्यांस पत्र देऊन तत्काळ दुरुस्त करणेबाबतची मागणी संघटनेचे लातुरजि.सचिव मारुती गुंडीले,व जिल्हा संघटक लक्ष्मण रणदिवे यांनी केली आहे,या मागणीची उप अभियंत्यांनी तत्काळ दख्खल घेऊन विद्युत कर्मचाऱ्यांना कामास पाठवुन दुरुस्ती सुरु केले आहे,
