उदगीर एल पी उगिले
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दि. 21 6 2024 रोजी सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये 'राधे कृष्ण' मंगल कार्यालय येथे जवळपास 2000 योग साधकांच्या उपस्थितीमध्ये योग साधनेचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमांमध्ये धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सुरुवातीला उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे , तहसीलदार राम बोरगावकर,
न.प.उदगीरचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर , शहर पोलीस निरीक्षक करण सोनकवडे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार तसेच उद्योगपती रमेशअण्णा अंबरखाने, धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ताजी पाटील , गटशिक्षणाधिकारी शेख, प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य संचालिका महानंदा बहिणजी,भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल निडवदे,देवणी बाजार समितीचे उपसभापती दिलीपजी मजगे, माजी नगरसेवक साईनाथ चिमेगावे तसेच उदगीर शहरातील सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचे पतंजली योग समिती च्या वतीने स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमात पतंजली योग समितीच्या सौ. सुमनताई चव्हाण यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर सुवर्णमाता देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योगशिक्षिका सौ अनिता संकाये यांच्या मार्गदर्शनाखाली योग नृत्य अतिशय उत्कृष्टपणे सादर केले.त्यानंतर पतंजली योगसमितीचे
अध्यक्ष सुरेंद्र आकनगीरे यांनी प्रास्ताविक केले.
प्रशासनाच्या वतीने सुशांतजी शिंदे
यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात योग समितीचे योगशिक्षक उमाकांतजी अंबेसंगे यांनी 'शंखनाद' करून सुरुवात केली. या योग साधनेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून पतंजली योग समितीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी शिक्षक संघटन धनराज बिरादार यांनी योग साधनेचे महत्त्व विशद करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात केली. भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडून आलेल्या सूचनेनुसार समाविष्ट केलेल्या आसन व प्राणायाम सर्व उपस्थितां कडून अतिशय उत्कृष्टपणे करून घेतली. सदर कार्यक्रमात पतंजली योग समितीचे योग शिक्षक तथा भारत स्वाभिमांचे अध्यक्ष प्राचार्य विरभद्र कपिकेरे व महिला पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्षा सौ मीनाक्षीताई स्वामी यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजली योग समिती उदगीरचे सचिव प्रा. श्रीराम चामले यांनी केले. आभार पतंजली योग समितीचे युवा अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी स्वामी यांनी केले.
