देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील विळेगाव येथील राम -लक्ष्मण तांड्याच्या रस्त्यावर पहिल्यांदाच लाल परी धावल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे, विळेगाव गावाच्या विकासात खांद्याला खांदा लावून साथ देणारे दोन्ही तांड्यातील बंजारा समाजाला रोजची तीन किलोमीटरची पायी फरफट बंद झाली, या मुळे बंजारा समाजवाशियांत आनंदाचे वातावरण आहे.विळेगाव गावापासून राम-लक्ष्मण दोन्ही तांडा वस्ती ३ किलोमीटर अंतरावर आहे, आणी या दोन्ही बंजारा वस्तीची लोकसंख्या एक हजाराच्या जवळपास असून, या दोन्ही वस्तीतून दररोज ४० ते ५० विध्यार्थी विळेगाव व देवणी येथे शाळा व कॉलेज साठी ये-जा करतात;रोज त्या विध्यार्थ्यांना जाने-येणे ६ किलोमीटर अंतर पाई चालून शिक्षणाचा उंबरा गाठावा लागतो, उन्हा-तान्हात-पावसात अनेक महिला व वयोवृद्ध नागरिकांना पाई चालण्याचा त्रास सहन करावा लागत होता, पण या बाबीकडे कोणाचेही लक्ष न्हवत, परंतु या दोन्ही बंजारा वस्तीच्या समाजाचा त्रास अगदी जवळून जाणून काहीही करून पाई प्रवासाला लाल परिच्या सुखमय प्रवासात रूपांतर करण्याचं ध्येय मनात बाळगून विळेगावचे सुपुत्र बेळकोने दीपक दत्तात्रेय (जिल्हा उपाध्यक्ष- भा ज पा युवा मोर्चा लातूर ग्रामीण ) यांनी मा. विभाग नियंत्रक साहेब राज्य परिवहन मंडळ लातूर यांना निवेदनद्वारे विनंती केली व बंजारा समाजाची रोजची होणारी पाई फरफट तारेवरची कसरत या बद्दल सविस्तर विस्तृत माहिती दिली, त्यांच्या निवेदनाच्या मागणीला मान्य करून वी. नि.रा.प.म. लातूर यांनी त्वरित आदेश काडून देवणी उप-आगाराची बस दि.२४/६/२०२४ पासून सकाळी ८:३० वाजता पहिली फेरी तर संध्याकाळी ५:०० वाजता दुसरी फेरी या प्रकारे विळेगाव राम-लक्ष्मण तांडा बंजारा समजहेतु लाल परीची बस सेवा सुरु करण्यात आली, या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व बंजारा समाजाच्या वतीने लाल परीची पूजा व चालक व वाहक यांचा सत्कार ही करण्यात आला, या वेळी गावकरी व बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता;
या बस सेवेमुळे गावात व संपूर्ण बंजारा समाजात आनंदाचे वातावरण आहे व तसेच सर्वत्र दीपक बेळकोने यांच्या नावाची स्तुती व चर्चा ही होत आहे.
