देवणी प्रतिनिधी : लक्ष्मण रणदिवे
देवणी -- मानवी हक्क अभियान ही संघटना शोषित कष्टकरी कामगार महिला बालके व दुर्बल घटक यांच्या हक्कअधिकारासाठी व कल्याणासाठी संविधानाच्या सनदशीर मार्गाने लढा देणारी संघटना असुन या संघटनेची देवणी येथे दि.२२/६/२०२४ रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत मानवी हक्क आभियांनाच्या अध्यक्षपदी गजानन गायकवाड,उपाध्यक्षपदी प्रशांत रणदिवे,देवणी
ता.सचिवपदी रवीमोतीरावे,देवणी ता.सहसचिवपदी रमाकांत सुर्यवंशी,देवणी तालुका कार्याध्यक्षपदी डी.एन.कांबळे, इत्यादींची निवड करण्यात आली,
या बैठकीला मानवी हक्क अभियानाचे लातुर जि.आध्यक्ष आनंद साळुंखे,व लातुर जि.ग्रामिण चे अध्यक्ष दत्ता गायकवाड, लातुर जि.सचिव मारुती गुंडीले, लातुर जि.संघटक लक्ष्मण रणदिवे,निलंगा ता.आध्यक्ष शिवराज गुरहाळे, हरिभाऊ राठोड,गणपत पवार,विलास भोसले प्रा.नरसिंग सुर्यवंशी इत्यादी उपस्थित होते,या निवडीबाबत परिसरात उत्साहाचे वातावरण असुन या निवडीबाबद परीसरातुन कौतुक करण्यात येऊन अभिनंदन केले जात आहे,
