उदगीर,
उदगीर येथील देगलूर रोड, शेटकार कॉम्प्लेक्स मधील आरोग्याची छाया न्यूट्रिशन सेंटर यांच्या कार्याची दखल घेऊन, बीड येथील शिबिरात नुकतेच या सेंटरचे कौतुक करून, त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक देण्यात आले. सध्या नागरिकात पाहिल्यास आरोग्याकडे प्रत्येक व्यक्ती हा लक्ष न देत असल्यामुळे, तो अनेक आजाराच्या विळख्यात सापडलेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या करिता निरोगी शरीर राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक व गरजेचे आहे. अनेक विकारापासून सुटका होण्यासाठी, देगलूर रोड उदगीर येथे शेटकार कॉम्प्लेक्स मध्ये आरोग्याची छाया न्यूट्रिशन सेंटर सौ. छायाताई साबणे यांनी चालू केलेले आहे. या सेंटरमध्ये वजन वाढलेल्या व्यक्तीचे वजन कमी करणे, कमी असलेल्या व्यक्तीचे वजन वाढविणे, व्यायामाचे धडे देणे, इत्यादी विकारावर रोज येथे सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण, आयुर्वेदिक चहा व नाश्ता दिला जातो. आज पावेतो जवळपास बऱ्याच व्यक्तींचे वजन कमी झालेले आहे. 5 किलो, 10 किलो, 15 किलो, वजन बऱ्याच व्यक्तींनी या सेंटरमध्ये सहभागी होऊन, कमी केलेले आहे. या सेंटरची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे. या सेंटरची दखल घेऊन, बीड येथे औरंगाबाद येथील माननीय, सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सौ.आशा चाटे यांनी मोफत शिबिर घेतले होते. या शिबिरात उदगीर येथील निरोगी छाया सेंटरचे संचालिका सौ. छाया साबणे व श्री.शंकर साबणे या उभयता बरोबरच वजन कमी केलेल्या अनेक व्यक्तीचे कौतुक करून, पारितोषिक प्रदान करण्यात आले. तरी या उदगीर मधील सेंटरमध्ये दररोज सहभागी होण्यासाठी, मोबाईल नंबर 7387624595 देगलूर रोड उदगीर, श्रीकृष्ण मंदिराच्या बाजूला, शेटकार कॉम्प्लेक्स मध्ये संपर्क साधावा, असे पण कळविलेले आहे.
