देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
कृषी विभागाच्या "डॉ पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवाडा" निमित्त विजयनगर येथे प्रकल्प संचालक आत्मा श्री एस. व्ही लाडके आणि प्रकल्प उपसंचालक श्रीमती बांगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी कार्यालय "पेआत्मा" च्या वतीने विजयनगर तालुका देवनी येथे तालुका कृषी अधिकारी श्री एस आर पाटील आणि मंडळ कृषी अधिकारी श्री बी एम जाधव यांच्या नियोजनाने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत स्थापित विजयनगर,बटनपूर, लासोना ता. देवनी येथील स्थापित शेतकरी गटातील शेतकऱ्यांचे सेंद्रिय शेती बाबत प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.सदरील प्रशिक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक म्हणून कृषीभूषण सेंद्रिय शेती श्री ओमकार माणिकराव मस्काल्ले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत रासायनिक शेती करणे म्हणजेच आपल्या शेतीचा ऱ्हास करणे असून आरोग्याचा सुद्धा पर्यायी रहास होत आहे यातून फक्त आणि फक्त सेंद्रिय शेतीच मनुष्य जातीला वाचवणारा असून शेतकऱ्यांनी जीवामृत बिजामृत गांडूळ खत निंबोळी अर्क इत्यादी निविष्ठा निर्मितीबाबत सखोल मार्गदर्शन करून त्या कशा वापराव्यात याबाबत सविस्तर माहिती दिली त्याच सोबत कामगंध सापळा विषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देऊन फळमाशी पाने खाणारी अळी पाने गुंडाळणारी अळी तंबाखू वरील पाने खाणारी अळी इत्यादी अळ्यावरती वेगवेगळ्या म्हणजेच कामगंध गोळीचा योग्य प्रकारे वापर करून कीड रोग सेंद्रिय पद्धतीने नियंत्रणात कशी आणता येईल याबाबत मार्गदर्शन केले.वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री राजकुमार बिरादार यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना अत्यंत चांगली योजना असून परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व सेंद्रिय शेती प्रमाणिकपणे करून कुटुंबाचे समाजाचे एकंदरीतच जिल्ह्याचे आरोग्य सुदृढ करण्यामागे मदत करावी असे आवाहन केले.
बी टी एम श्री राहुल जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी उपयोगी योजनांची सविस्तर माहिती देऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत देवणी तालुक्यात ५० हेक्टरचे सात गट व २५ हेक्टरचे पाच गट स्थापित झालेले असून या योजनेखाली एकूणच ४७५ हेक्टर क्षेत्र नोंदणी करत झालेली असून उर्वरित २५ हेक्टर क्षेत्र वलांडी या परिसरामध्ये होणारा सून ५०० हेक्टर ची लक्षांक पुढील आठवड्यामध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगून ५३० लोक या योजनेमध्ये समाविष्ट झालेले असून जवळपास ५०० लोकांचे माती नमुने ऑनलाईन करण्यात आलेली असून आजतागायत जिल्हा माती परीक्षण कार्यालयामध्ये ४७५ माती नमुने परिपूर्णरित्या दाखल करण्यात आलेले असून उर्वरित २५ माती नमुने पुढील आठवड्यामध्ये रीतसर दाखल करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी या योजनेचा प्रामाणिकपणे लाभ घेऊन सेंद्रिय शेती चालना द्यावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रगतिशील पुरस्कार प्राप्त शेतकरी नामदेवराव पाटील हे उपस्थित होते तर गोमाता नैसर्गिक शेतकरी गट जरांगे पाटील नैसर्गिक शेतकरी गट कशी भूमी नैसर्गिक शेतकरी गट या गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती माया श्रीनामे यांनी केले.
