देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
लातुर जिल्ह्यातील तिरुका येथील भुमिहीन मजुर बेघर लोकांनी शासकीय जमीनीवर रहाण्यासाठी केलेले अतिक्रमण केले असुन ते कायम करुन त्यांच्या नावे ग्रा.प. नमुना ८ ला नोंद करण्यात यावे अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने जळकोट तहसिलदाराकडे करण्यात आले आहे,तिरुका येथील २७शासकीय जमिनीवर वास्तव्यात असलेल्या लोकांनी ही मागणी केली आहे, नमुद बेघर लोकांनी गेली पन्नास वर्षे पुर्वी पासुन घरासाठी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन ते वास्तव्य करीत आहेत,मात्र त्यांच्या ताब्यातील रहाते घरांची जागा अद्यापही त्यांच्या नावे करण्यात आली नाही व त्या संबंधीचा कुठलाही कायदेशीर हक्क त्यांना देण्यात आला नाही,आसे ही संघटनेने निवेदनात नमुद केले आहे,समक्ष उपस्थित राहुन अतिक्रमित बेघर लोकांनी प्रत्येकी घरासाठी अतिक्रमण केलेल्या जागेसंबधी व ते या गावचे रहिवासी असल्याच्या पुराव्यांची लेखी माहिती संघटनेच्या पत्रासोबत जोडुन देण्यात आली आहे,ही सर्व लोक भुमिहीन मजुर असुन मजुरीवर केवळ उदरनिर्वाहच भागवता येतं असुन या महागाई च्या काळात ते रहाण्यासाठी स्वतःसाठीची जागा खरेदी करण्यास असमर्थ आहोत,अशी प्रतिक्रिया उपस्थीत भुमिहीनानी दिली आहे,मे.तहसिलदार जळकोट यांच्याअधिपत्याखालील क्षेत्रात कोणी ही बेघर राहु नये यासाठी में.तहसिलदार यांनी काळजी घ्यावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे,अतिक्रमित लोकांनी अतिक्रमण केलेली जागे त्यांच्या नावे नोंद करुन त्यांना त्यांच्या नावे नोंदीचा ग्रा.प.नमुना ८ या प्रत्येकाला मिळवुन देण्याची तजवीज करावी व या संबंधीची करण्यात आलेली कार्यवाहीची लेखी माहिती संघटनेस कळविण्यात यावे अशी मागणी ही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे ही या निवेदनावर मानवी हक्क अभियानाचे लातुरजि.सचिव मारुती गुंडीले.संघटनेचे जि.संघटक लक्ष्मण रणदिवे.जळकोट ता.महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी वाघमारे, हरिभाऊ राठोड,गणपत पवार,तुकाराम सवारे.रेखाबाई गायकवाड,शोभा कांबळे, वर्षा काकडे,केराबाई सवारे,रुक्मिणीबाई जाधव,उत्तम मनदुबळे,भास्कर सवारे,विक्रम मसुरे,रमेश कांबळे, इत्यादी सह ३५ लोक उपस्थित होते,मारुती गुंडीले लातुर जि.सचिव.लक्ष्मण रणदिवे लातुर जि. संघटक,अश्विनी वाघमारे अध्यक्ष महिला आघाडी जळकोट,आनिल घोडके जळकोट ता.सचिव,हरिभाऊ राठोड जळकोट सह सचिव.गणपत पवार,तुकाराम सवारे.
