उदगीर, जिल्हा बीड येथे निरोगी शरीर राहण्यासाठी हॉटेल अनिता जालना,रोड येथे फॅमिली डे मोफत आरोग्य तपासणी हे शिबिर नुकतेच संपन्न झाले.आज रोजी पाहिल्यास धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती हा शरीराकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक आजार होत आहेत. यामध्ये शरीरावरील चरबी, जाडपणा, बीपी, शुगर, हाडातील ठिसूळपणा, अपंगत्व, वजन वाढणे असे अनेक आजार प्रत्येक व्यक्तीमध्ये जडत असल्याचे चित्र दररोजच्या जीवनात समाजामध्ये वावरत असताना दिसून येत आहे. यासाठी निरोगी शरीर राहण्यासाठी बीड येथील सौ.आशा चाटे व सचिन चाटे यांनी या शिबिराचे आयोजन केलेले होते. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून सविता अँड. सचिन पाटील यांना निमंत्रित केलेले होते. या शिबिरात सौ.आशा चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज शिबिरात येत असलेल्या व्यक्तीचे 5 किलो, 10 किलो, 20 किलो वजन कमी केलेल्या व्यक्तीना पारितोषिक देऊन, कौतुक करण्यात आले. या शिबिरात 200 पेक्षा जास्त फॅमिली मेंबर यांनी आपला सहभाग नोंदवून, आनंद घेतला. यावेळी औरंगाबाद येथील माननीय,सचिन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने आपले शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये जिद्द, चिकाटी, काम करण्याची क्षमता असेल तर तो व्यक्ती निरोगी शरीर राहण्यासाठी चांगले जीवन जगू शकतो असे त्यांनी मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. यावेळी चाललेल्या तीन तासाच्या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्ती हा शांतपणे ऐकून घेत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. व्यक्तीच्या शरीराला निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी चहा व नाश्त्याची गरज असल्याचे पटवून दिले. या शिबिरात प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ज्या नाश्त्यांमधून विटामिन सारखे पदार्थ मिळण्याची गरज, यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला उदगीर येथील संचालिका सौ. छाया साबणे, श्री अशोक साबणे, तसेच बाहेर गावाहून आलेले अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. या शिबिरासाठी सौ. आशा चाटे व सचिन चाटे व त्यांच्या मित्रमंडळींनी विशेष परिश्रम घेतले. ज्या व्यक्तींना दररोजच्या शिबिरात भाग घ्यायचे आहे, अशा व्यक्तीने मोबाईल नंबर 9422242624 या नंबर वर संपर्क साधावे, असे पण त्यानी शेवटी कळविले आहे.
