उदगीर (एल.पी.उगीले) १२ व्या शतकातील थोर समाजसेवक, समतानायक महात्मा बसवेश्वर यांची ९१९ वी जयंती उदगीर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर सायंकाळी शहरात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ५ वा. महात्मा बसवेश्वर चौक, रेल्वे स्टेशन येथे राज्याचे क्रीडा व युवककल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रीफळ फोडून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीत समाजाच्या वतीने यंदा डॉ. विश्वनाथ डांगे यांना घोड्यावर स्वार करण्यात आले होते.या मिरवणुकीत समता नगर व श्री
हावगीस्वामी युवक मंडळासह महिला भजनी मंडळ टाळ मृदंगाच्या गजरात गुरुराज माऊली, म. बसवेश्वरांचा
जयघोष करीत पाऊले खेळण्यात तल्लीन झाली होती.
यावेळी डीजेच्या वाद्यावर तरुण मंडळी नृत्यात तल्लीन झाली होती. या मिरवणुकीत बंजारा समाजातील महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांचे बंजारा नृत्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,रेमंड शॉप, मुक्कावार चौक,
हनुमान कट्टा, आर्य समाज,सराफ लाईन, चौबारा, कॉर्नर चौक, शहर पोलीस ठाणे मार्गे म. बसवेश्वर पुतळा,
न. प. संकुल येथे आल्यानंतर या ठिकाणी मंगल आरती होवून महाप्रसादाने सांगता झाली. या मिरवणुकीतील बसवप्रेमींकरीता श्रीराम प्रतिष्ठान व इतर सामाजिक संघटनांनी मिरवणूक मार्गावर प्रसाद व पाण्याची व्यवस्था केली होती.या जयंती महोत्सवात माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, बसवराज पाटील कौळखेडकर, मनोज पुदाले, उत्तरा कलबुर्गे, लक्ष्मीबाई पांढरे, बाबुराव हिप्पळगे, सुभाष धनुरे, नागेश आष्टुरे, गणेश गायकवाड,रेखा कानमंदे, प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी, बाबूराव पांढरे,उध्दव महाराज, बालाजी
पाटील नेत्रगावकर, रमाकांत
चटनाळे, राजकुमार मोगले,
राम मोतीपवळे, रविंद्र हसरगुंडे, सुनील हावा,प्रभुराज कप्पीकेरे, मनोहर लोहारे, चनबसप्पा वगदाळे, डॉ. महेश भातांब्रे, बाबुराव माशाळकर, अमोल निडवदे,
श्रीकांत पांढरे, अमोल अनकल्ले,
उमाकांत वडजे, पप्पू डांगे, अंकुश आठाणे,बाबूराव झुलपे, सरोज वारकरे,
अनिता नेमताबादे, बबिता पांढरे, गुरू
पांढरे, दिलीप माका, राजकुमार हुडगे, ऍड.एस.टी. पाटील, शिवराज पाटील, राचप्पा कपाळे,हणमंतराव औरादे, भरत करेप्पा,कपिल शेटकार,
राजकुमार बिरादार,शिवकुमार गुलंगे,
साईनाथ चिमेगावे,विजयकुमार चवळे,
शांतवीर मुळे,अनिल मुळे, सुमित
बागबंदे, अनिल बागबंदे, कुणाल
बागबंदे, रवी कड्डे, शिवकुमार
उप्परबावडे, दत्ता खंकरे, महेश
तोडकर, रवी स्वामी, गुंडप्पा बागबंदे,
राजकुमार उस्तूरे, नागेंद्र आंबेसंगे, सुशील जीवणे, दिनेश स्वामी,
कलप्पा स्वामी,आडेप्पा अंजुरे, घाळप्पा
वल्लूरे, गुंडू समगे, श्रीधर बिरादार, प्रा.
डॉ. रमेश मुलगे, अँड.महेश मळगे, सचीन चोबळे,बसवराज कनाडे, संदीप पाटील, विपीन जाधव, अजय
शेटकार, राजकुमार नौबदे, प्रा.
अश्विन हावा, मंगला आंबेसंगे, श्रीदेवी खंदारे, मुन्ना हुसाळे, सतीश पाटील, रविंद्र कोरे, राजकुमार गुळगे, बसवराज बाबजी, शामल कारामुंगे, शांताबाई देशमुख, नंदू पटणे, सुरेश स्वामी सह बसवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
