Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उदगीरचे भूमीपूत्र संतोष घोणे यांना फ्रांसच्या विद्यापीठाची पीएचडी प्रदान

                                       



 उदगीर(एल. पी.उगीले) उदगीर येथील शिक्षक पाडूरंग घोणे यांचे सुपुत्र संतोष पांडूरंग घोणे रोजगाराच्या शोधात गेलेले संतोष घोणे ध्येयाचे एक एक पाऊल गाठत कालांतराने स्वत: इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ लागले व सन 2000 नंतर स्वत: लेबर कॉन्ट्रॅ्नटरशीप घेऊन कंपन्यांना लेबर, से्नटुरीटी, हाऊसकिंपीग ते एचआर पर्यंत कुशल,अकुशल व सुशिक्षीत कामागार पुरवठा करू लागले. या क्षेत्रामध्ये त्यांंनी उंच भरारी घेऊन तिरूपती ग्रुप या नावाने औद्योगीक क्षेत्रात आपले नाव केले. व्यवसाय करत याच क्षेत्रातील त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, त्यांना दि  थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रांस या विद्यापीठाने पीएचडी पदवी बहाल केली.  

संतोष घोणे यांनी बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स ह्युमन रिसोर्स अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली. थेम्स विद्यापीठातून संतोष घोणे हे या विषयामध्ये पदवी मिळविणारे एकमेव भारतातील उद्योजक आहेत. यासाठी प्रा. राकेश मित्तल यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.थायलंड येथे झालेल्या आशिया- पॅसिफिक शैक्षणिक परिषदेत, आदीपू विद्यापीठाचे प्रमुख डॉ. जिदप्पा थेवारिन, थेम्स विद्यापीठाचे कॅडमीक संचालक डॉ. इर्विन डेलीन टोरस यांच्या हस्ते हि पदवी बहाल करण्यात आली.

संतोष घोणे यांना आशिया पॅसिफिक एज्युकेशन समीट मध्ये आशिया आयकॉनिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.संतोष घोणे यांनी बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स ह्युमन रिसोर्सेस या क्षेत्रामध्ये 32 वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी आजतागायत 300 कंपन्यांना सुमारे 6 हजार कुशल कामगार पुरवठा केला आहे. तसेच ते औद्योगिक कामगार सेवा, सुरक्षा सेवा, कामगार संपर्क आणि प्लेसमेंट सेवा पुरवठा करत आहेत.  

यावेळी घोणे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात कंपनी मालक आणि कामगार यांच्यात समन्वय असायला पाहिजे. कुशल कामगारांना नोकरीची संधी मिळत नाही. ज्या कामगारांना नोकरीची संधी मिळते त्यांना कंपनीकडून खूपच अपेक्षा आहेत. यामुळे कामगार आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात मोठी दरी निर्माण झालेली आहे.कामगारांसाठी असलेली तळमळ, उत्तम समन्वय साधण्याची वृत्ती, कामाचा प्रदीर्घ अनुभव, माणसे जोडण्याची कला आणि समाजाप्रतीची बांधिलकी या श्री घोणे यांच्या गुणांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.