देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील वलांडी येथे अंगणवाडी क्र २ चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.तर प्रशासन जाणून बूजून दूर्लक्ष करीत आहे का ? अंगणवाडी कामाला कंत्रटदाराचा मणमाणी कारभार दिसून येत आहे.१ ते ६ वयोगटातील लहान बालके शिक्षण घेण्यासाठी ही अंगणवाडी तयार करण्यात येत आहे.अंगणवाडीच्या कामाचे कॉलम व भिम कॉलमला एकत्रित जोडण्यात येणारी रींग ही नियमा प्रमाणे ५ ते ६ ईंचावरती बांधने अनिवार्य आहे तर असे न करता कंत्रटदाराचे मणमाणी कारभारामूळे ही रिंग ८ते ९ ईचावर बांधून अंत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे.व झालेल्या कामाला पाणी मारने खूप महत्वाचे असते तर पाणी पण वेळेवर मिळत नसल्याने कामाला मजबुती किंवा स्ट्रेन्थ येत नाही पाणी पण २ ते ३ दिवसातून एकदा मारण्यात येत आहे. तर शासणा मार्फत या कामाची सखोल चौकशी करून कंत्रटदार व इंजिनिअर वरती कारवाई करण्याची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे सगीर मोमिन यांच्या वतिने गट विकास अधिकारी यांना निवेदना द्वारे देण्यात आली आहे.
नोट.......
येत्या आठ दिवसात या कामाची चौकशी करून कंत्रटदार व इंजिनिअर वरती कार्यवाही नाही झाल्यास संघटनेच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
