Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री गुरु हावगीस्वामी मंदिर कळसारोहण व दिपोत्सव उत्साहात संपन्न




उदगीर (एल.पी.उगीले) श्रीगुरु हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कळसारोहण व दिपोत्सव सोहळा   काशी पीठाचे जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

उदगीरचे आराध्य देवत श्री गुरु हावगीस्वामी महाराज   मंदिरवर सुवर्ण कळसारोहण सोहळा निमित्य श्री गुरु हावगीस्वामी शेतमळा बिदर रेल्वे गेट बिदर रोड उदगीर येथे 13 मे ते 20 मे दरम्यान शिवनाम सप्ताह,परमरहस्य ग्रंथाचे पारायण ,प्रवचन, किर्तन गाथा भजन व शिवपाठ रिंगण सोहळा संपन्न झाला.  परमरहस्य ग्रंथ पारायणाची सांगता होऊन   भव्य रथात काशीपीठाचे जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी,  यांची सुवर्ण कलश ,परमरहस्य ग्रंथ ची भव्य मिरवणूक  काढण्यात आली. या रथात डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज,सिध्दलिंग महास्वामी देवणी,शंभुलिंग शिवाचार्य आंबेजोगाई, देशिकेंद्र महाराज  आदी शिवाचार्य ची कलशधारी सुवासीनी महिला, विविध गावचे महिला भजनी मंडळ टाळमृदगाच्या गजरात गुरुराज माऊलीचा गजर करत, पाऊले खेळत सहभागी झाले होते.ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलिस स्टेशन, पत्तेवार चौक, पुदाले चौक, वीरशैव समाज,आर्य समाज, चौबारा मार्गे श्री गुरु हावगी स्वामी मंदिर येथे सुवर्णकळस मुरवणूकिचा समारोप झाला. काशीपीठाचे जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महारा यांचे हस्ते विधिवत सुवर्णकळस पुजन करुन  शिवनामाचा गजर करत हजारो भक्तांच्या उपस्थितित  मंदिरावर  सुवर्ण कळस चढवण्यात आला.

सायंकाळी श्री गुरु हावगीस्वामी मंदिर वर  व प्रारंणात महिलांनी दिप लावले, दिपोत्सव व सप्तरंगीत फटाक्याची आतषबाजी करुन  दिपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शंभूलिंग शिवाचार्य महाराज,   महादेव शिवाचार्य महाराज  वाईकर,शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई,सिध्दलिंग महास्वामी देवणी,म.नि.प्र.शिवानंद महास्वामी  सायगावकर , सिध्दओमकार शिवाचार्य जंगमवाडी,मुरुगेंद्र स्वामी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.