उदगीर
निरोगी आरोग्याचे दालन' न्यूट्रिशन सेंटर, उदगीर नगरीमध्ये शेटकार ई स्टेट देगलूर रोड उदगीर येथे आरोग्याची छाया न्यूट्रिशन सेंटर या नावाने गेली पाच महिन्यापासून सेवेत चालू आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस वेळेअभावी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास फारसा वेळ देत नाही, हे सत्य परिस्थिती आहे, तसेच दिवसभराच्या जेवणामध्ये सकस व पौष्टिक आहार मिळणे देखील कठीण झाले आहे. याचा परिणाम मानवी शरीरावर सातत्याने होत आहे. उदाहरणार्थ शरीराची रचना ,लठ्ठपणा, स्नायू, गुडघेदुखी, दम लागणे, शारीरिक थकावट, झोप कमी लागणे, मानसिक ताणतणाव इत्यादी आजाराने आजचे जीवनमान त्रस्त झाले आहे .या सर्वांचे अनेक कारणे सांगितली जातात. परंतु जेवणामध्ये सकस आहार व दैनंदिन दिनचर्या, यामध्ये अमुलाग्र बदल झाल्यामुळे माणूस नैराश्य जीवन जगत आहे, वरील सर्व समस्या लक्षात घेता न्यूट्रिशनचा चहा व नाश्ता या सकस आहारातून ,प्रोटीन, जीवनसत्व मिळाल्या मुळे,अनेकांचा लठ्ठपणा, दहा ते पंधरा किलो वजन कमी, गुडघे दुखणं , कमी मानसिक ताणतणाव, इत्यादी समस्या पासून एक ते पाच महिन्यात अनेकांचे निकाल दिसून आले आहे. न्यूट्रिशन आहारासोबतच दैनंदिन आहार, जीवनमान ,व्यायाम करण्याचे प्रकार इत्यादीचे मार्गदर्शन केले जाते. न्यूट्रिशन सेंटरच्या संचालिका सौ. छाया साबणे व त्यांचा परिवार निरोगी राहण्यासाठी उदगीर नगरीमध्ये गेली पाच महिन्यापासून सेवेत काम करत आहे. त्यांचा संपर्कासाठी पत्ता, शेटकार इस्टेट ,कृष्ण मंदिराच्या शेजारी , देगलूर रोड, उदगीर.मो.नं.7387624595, हा आहे.
