देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
हेळंब गावातील भूमिपुत्र,ज्ञानेश्वर भगवानराव मोरे ,याची भारतीय रेल्वेत, RRB तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत २०२३ ला,कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली,त्याच दरम्यान झांशी,उत्तर प्रदेश येथून १ वर्ष ट्रेनिंग पूर्ण करून २९ एप्रिल २०२४ ला,माटुंगा वर्कशॉप रेल्वे,मुंबईत रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने श्री.नरेंद्र मोदींच्या हस्ते नियुक्ती पत्र मिळून त्याची पोस्टिंग झाली.
देवणी तालुक्यातील, हेळंब गावातून भारतीय रेल्वेत रुजू होणारा मोरे ज्ञानेश्वर हा पहिलाच तरुण आहे,त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
ज्ञानेश्वरचे वडील,भगवान गुणवंत मोरे हे गावातील "नागाबुवा वाचनालयात",ग्रंथपाल पदी रुजू होते.तशी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती पण त्यांनी शेतीसोबतच किराणा दुकान चालवून,घरातील वातावरण शिक्षणमय ठेऊन मुलाचे शिक्षण पूर्ण केले.याची जाण ठेऊन ज्ञानेश्वरने परंपरागत व्यवसायाला फाटा देत अभ्यासू व्यक्तिमत्त्व,जिद्द,चिकाटीच्या बळावर प्रत्येक परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले.
ज्ञानेश्वरचे अभियांत्रिकीचे शिक्षण "गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च", अवसारी खुर्द,पुणे येथील (E & TC)इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन शाखेतून पदवी घेऊन पूर्ण झाले.इंजिनिअरिंग नंतर ज्ञानेश्वरने गेट(GATE)परीक्षा उत्तीर्ण करून "संरक्षण संशोधन आणि विकास केंद्र"(DRDO)अहमदनगर येथे कनिष्ठ संशोधक पदी २ वर्ष तसेच वरिष्ठ संशोधक पदी जवळपास २ वर्ष फेलोशिप केली.त्यानंतर कुठेच न थांबता ज्ञानेश्वरने प्रायव्हेट कंपनी "फिलिप्स" मध्ये १.५ वर्ष मेडिकल डोमेन पदी तर "एक्सपलो"(Expleo) मध्ये २ महिने IT डोमेन पदी काम केले.अशाप्रकारे २०१८ ते २०२१ या दरम्यान ज्ञानेश्वरने अपयशाने खचून न जाता, अभ्यासात सातत्य ठेऊन खूप साऱ्या सरकारी परीक्षा दिल्या.
मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते,ध्येय नक्कीच गाठता येते.हीच जिद्द समोर ठेऊन ज्ञानेश्वरने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.ज्ञानेश्वरच्या या यशाबद्दल हेळंब गावात घराघरात,चौकाचौकात, खेडोपाडच्या वाचनालयात,अशा विविध ठिकाणी सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात येत आहेत.
