Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संतांना सदाचार आवडतो; सदाचारी बना - ना. संजय बनसोडे





    उदगीर (एल.पी.उगीले) : धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवनाचा विचार करणाऱ्या संतांनी जातीनिरपेक्ष लोकशाहीचा पुरस्कार केला. संतांना सदाचार आवडतो. सदाचारी माणसेच संतांना प्रिय असतात. मानवी जीवनात संतकृपा, ग्रंथकृपा अगत्याची बाब असून संतांच्या कृपाशीर्वादाने उदगीरचा आवाज आपल्याला अयोध्येत पोहचवायचा आहे. देवाकडून देशाकडे हे मोदींचे बलाढ्य राष्ट्र उभारणीचे समीकरण असून पुढील अनेक दशकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्व देशाला पाहिजे, असे भावोत्कट प्रतिपादन ना.संजय बनसोडे यांनी केले.  

जगद्गुरु पंचाचार्यांच्या दिव्य सान्निध्यात, मठाधीश डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली उदगीर येथे सुरू असलेल्या ५०५१ सद्भक्तांच्या अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायणाचा शेवटचा दिवस आणि भव्य कलश यात्रेचा मुख्य दिवस विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या थाटात संपन्न झाला. हे धार्मिक कार्यक्रम वाराणसीचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य भगवतपादंगळू  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी जगद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन आपले चिंतन ना. बनसोडे यांनी मांडले.

    पुढे बोलताना ना.बनसोडे म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादात खूप मोठी शक्ती आहे. जनतेने मला लोकसेवक म्हणून निवडून दिले, म्हणून मी एवढी विकासाची कामे करु शकलो, मतदार संघासाठी अहर्निश मेहनत घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी निश्चिंत झालो आहे. कारण यापुढे मी निवडून यावे यासाठी मायबाप जनताच मेहनत घेणार आहे. मला नजीकच्या काळात उदगीरकरांचे जिल्ह्याचे डोहाळे पूर्ण करायचे आहेत. आपणास उदगीरसह महाराष्ट्राला अव्वलस्थानी न्यायचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान वाराणसीतील जंगमवाडी मठामध्ये उभारण्यात आलेल्या भक्त निवासासाठी अकरा लक्ष निधीचा धनादेश ना. संजय बनसोडे यांनी महास्वामी डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी बसवकल्याण-सस्तापूर बंगल्याच्या धर्तीवर उदगीर येथील वीरशैव-लिंगायत भवनाची कमान उभारावी, यासाठी कंत्राटदारास  ना. बनसोडे यांनी आदेशित केले.

    प्रास्ताविक शिव भक्ती परायण शिवराजप्पा नावंदे गुरुजी, शि. भ. प. अनिताताई हैबतपूरे यांनी केले.

    या मंगलप्रसंगी धर्म संदेश देताना काशीचे महास्वामी डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज म्हणाले की, गुरुतत्व सर्वश्रेष्ठ आहे. अपार गुरुश्रद्धेतून लौकिक वैभवात भर पडते. आईवडील, ईश्वर आणि सद्गतीचे मार्ग दाखवणारे गुरु यांच्या ऋणातून मुक्त झाल्याखेरीज मोक्ष प्राप्ती होत नाही. पुढे महास्वामीजी म्हणाले की, जनतेमध्ये समरस होणारा नेता गरजेचा आहे. उदगीरच्या जनतेसाठी विकासकामे खेचून आणणारे संजय बनसोडे हे विकासपुरुष आहेत.

शंभुलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, जगद्गुरूंच्या रुपाने काशीहून गंगा उदगीरला आली आहे. गुरुशिवाय अमृतज्ञान असाध्य आहे असे मौलिक विचार शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.