देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
जगद्व्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त देवणी येथे ध्वजारोहण, रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम घेण्यात आले. शनिवारी सायंकाळी शहराच्या मुख्य चौकातून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीच्या प्रारंभी शिवयोगी श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती म नि प्र सिद्धलिंग
महास्वामीजी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ही मिरवणूक वीरशैव लिंगायत मठ, चावडी गल्ली, विष्णू मंदिर, मारुती मंदिर, जुने बसस्थानक, मार्केट कमिटी, बोरोळ चौक, खंडोबा चौक, गांधी चौक, गवंडी गल्लीमार्गे वीरशैव मठात परतली. यावेळी शिवकुमार गणेश बोंद्रे यांनी महात्मा बसवेश्वर यांची वेशभूषा परिधान केली होती. यशस्वितेसाठी महात्मा बसवेश्वर जयंतीचे अध्यक्ष सूरज अंबुलगे आदींनी परिश्रम घेतले
