Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल-अमीन माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल.




उदगीर (एल.पी.उगीले): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अल-अमीन माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा राखत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के दिला आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्रजी व उर्दू माध्यम दोन्ही माध्यमांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यात उर्दू माध्यमांच्या शाळेत एक अग्रेसर नाव अल-अमीनचे आहे.

यावर्षी विद्यालयातून एकूण 143 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी पाच विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळविले. 43 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत 58, द्वितीय श्रेणीत 31 व यशस्वी श्रेणीत 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शंभर टक्के निकाल देऊन विद्यालयाने यशस्वीतेची परंपरा कायम ठेवली आहे.

शेख़ फ़रीसा इस्माईल या विद्यार्थिनीने 91.80 % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. दायमी सयदा ज़ुबिया मुज़म्मील या विद्यार्थिनीने 91.60% गुण मिळवून दुसरी तर तंबोली मोहम्मद फ़हद महेमूद या विद्यार्थ्याने 91.40% गुण मिळवून विद्यालयातून तिसरा आला आहे. शेख सुफियान जब्बार 91.00 गुण मिळवून चौथा तर शेख ज़ुफ़रा बेगम नाज़ीम 90.40% गुण मिळवून विद्यालयातून पाचवा क्रमांकावर आली आहे.

विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशात विद्यार्थ्यांच्या कष्टाबरोबरच संस्थेचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच प्राचार्या सय्यदा आज़ेमा बेगम, पर्यवेक्षक ग़ुलाम ग़ौस खान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.

विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशाबद्दल अल-अमीन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर इसाखान, सचिव  शेख अकबर व इतर पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.