उदगीर (एल.पी.उगीले)
नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड -2024 च्या परीक्षेत पाटील बायोलॉजी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.या परीक्षेत बायोलॉजी विषयात विद्यार्थ्यांना भरभरून यश मिळाले. क्लासेसच्या विद्यार्थी सौंदर्य आंबेसंगे व गादगे अंजली या शंभर पैकी 98 गुण घेऊन उदगीर शहरात सर्वप्रथम आल्या. तसेच सुवर्णा हुडे 97, साक्षी गंगापुरे 97 या विद्यार्थिनी सर्वद्वितीय आल्या.
तसेच केंद्रे निशा 96 ,श्रद्धा वीरकपाळे 96, श्रेयश बिरादार 96, विकास चव्हाण 96 ,गुण घेऊन सर्वतृतीय आले.
क्लासेस मधीलच दिव्या केंद्रे 95, जाधव ममता 94, समर्थ बिरादार 93, चव्हाण किरण 93, कुंटे अभिजीत 91, चव्हाण किरण 91, पाटील आकांक्षा 91 ,आंबेगावे प्रतीक्षा 91, हंबीर श्रेया 90, पियुष कुलकर्णी 90 , भाटसांगवे नम्रता 90 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले.तसेच क्लासेसच्या तब्बल 23 विद्यार्थ्यांना 80 ते 90 च्या मध्ये गुण मिळवले. या घवघवित यशाबद्दल महाराष्ट्र पी टी ए चे उपाध्यक्ष व उदगीर पी टी ए चे तालुका अध्यक्ष प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्लासेसचे संचालक डॉ. धनंजय पाटील यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
