Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्पणच्या उज्वल यशाची परंपरा कायम.




उदगीर (एल.पी.उगीले) येथील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, आत्मविश्वास व अथक परिश्रमाचे बीज पेरणाऱ्या समर्पण करिअर इन्स्टिट्यूटने सलग पाचव्यांदा घवघवीत यश संपादन केले असून 100% निकालासह,  राज्यातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये समर्पणच्या विद्यार्थ्यांनी स्थान प्राप्त केले आहे. एच एस सी बोर्ड परीक्षेतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित व इंग्रजी या पाचही विषयांमध्ये समर्पणच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. बायोलॉजी या विषयात उर्मिला शिंदे हिने 100 पैकी 100 तर गणित या विषयात ओमकार कुंटे याने 100 पैकी 100 गुण  मिळवत राज्यातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त करून समर्पणच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.

अंजली केंद्रे 88.00% गुण घेऊन समर्पण मध्ये सर्वप्रथम, अनुराधा दासेवार 87.83% गुण घेऊन सर्व द्वितीय तर जान्हवी कांबळे हिने 87.67% गुण घेऊन सर्व तृतीय आलेली आहे. याचबरोबर भाग्यश्री बिरादार 87.50%, प्रतीक्षा मोरे 87.33%, आरती मुळे 87.17%, मयुरी वल्लूरे 87.00%, तानाजी देमगुंडे 86.50%, दुर्गा कच्छवे 86.50%, प्रथमेश दावनगावे 86.33%, रेणुका सावंत 86.00% ओमकार काकडे 85.50%, पाटील श्रुती 86.50%, वैष्णवी कलमे 85.17%, साक्षी केंद्रे 85.17%, वैष्णवी बाके 84.33%, शिवलिंग चवळे 84.33%,  मौला इश्रफिल 84.17%, शाहीद शेख 84.17%,सोनाली वाडकर 84.00%,  मयुरी कोकाटे 83.67%, वैष्णवी कोकाटे 83.00%, कोरे सपना 83.00%, तीमती कांबळे 82.50%, नंदिनी भोसले 82.00, ऋतुजा शेळके 82.00%,  श्रद्धा इंगळे 81.83%,  स्नेहा जाधव 81.66%,  पाटील साक्षी 81.05%,  मार्तंडे नंदिनी 81.00%,  शेख सुमेरा 80.33%,  शिंदे उर्मिला 80.33% गुण संपादन केले आहे.

समर्पण चे 50 पैकी 38 विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण, तसेच बायोलॉजी मध्ये 90 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 34 विद्यार्थी, केमिस्ट्री मध्ये 90 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 23 विद्यार्थी, गणितामध्ये 80 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 31 विद्यार्थी, फिजिक्स मध्ये 75 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 29 विद्यार्थी तर इंग्लिश मध्ये 70 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 26 विद्यार्थी हा तालुक्यातील सर्वोत्तम निकाल आहे. 

यासाठी समर्पणचे संचालक प्रा. अविनाश पाटील, संचालक प्रा. सुनिल ढगे, संचालक प्रा. डॉ. पांडुरंग फड, संचालक प्रा. विकास पाटील,  प्रा. राधाकिशन जाधव, प्रा. पवन नलाबले, प्रा. श्रीदेवी पाटील व टीम समर्पण यांनी परिश्रम घेतले आहे, याबद्दल सर्व विद्यार्थी व टीम समर्पण यांचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.