Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पूर्ण केली -- श्रीकांत पाटील




 उदगीर (एल.पी. उगिले)

क्रीडा क्षेत्रातील रसिकांना मेजवानी ठरावी, आणि ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने काँग्रेस पक्षाचे युवा नेते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख यांनी लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करून, पहिल्यांदा तालुका पातळीवर स्पर्धा घ्यायच्या आणि त्यानंतर तालुक्यातील विजेत्या संघाच्या स्पर्धा जिल्ह्याच्या ठिकाणी स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करायचे, असे नियोजन करून कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या. उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी तून बाजार समितीचे सभापती शिवाजी अण्णा हुडे, संचालक संतोष बिरादार, पद्माकर उगिले, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव उषाताई कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुका क्रीडा स्पर्धांचे नियोजन युवा मित्रांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आपल्याला चांगले यश आले. अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्रीकांत कल्याणराव पाटील यांनी दिली आहे.

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धांची ही तिसरी टर्म आहे. काँग्रेस पक्षात आपण प्रवेश केल्यानंतर आपल्यावर सोपवलेली ही मोठी जबाबदारी होती. स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आपण सार्थ ठरत, या स्पर्धा यशस्वी केल्या आहेत. राजकीय डावपेच खेळून काही वेळा या क्रीडा स्पर्धांमध्ये अडचणी आणण्याचाही प्रयत्न काही लोकांनी केला. मात्र त्यावर मात करत शासकीय दूध योजनेच्या पाठीमागच्या मैदानावर नव्याने क्रीडांगण तयार करून या स्पर्धा संपन्न केल्या आहेत. या स्पर्धांसाठी उदगीर तालुक्यातील काँग्रेस प्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. ग्रामीण भागातील संघही मोठ्या प्रमाणात आम्ही आवाहन केल्यानंतर लगेचच सहभागी झाले. निसर्गाने ही या काळात आम्हाला साथ दिली. आमचे मनोबल वाढवले.

 या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी युवकांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आ. धीरज भैय्या देशमुख यांनी स्वतः उपस्थित राहून अंतिम सामन्यासाठी टॉस करून स्पर्धा सुरू केल्या, आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

 उदगीर येथील या नियोजनाबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. या स्पर्धा यशस्वी व्हाव्यात म्हणून काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले, आशिष पाटील राजूरकर, रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे भास्कर पाटील, सोमनाथपूरचे नेते प्रदीप पवार, राजेश्वर भाटे, प्रा गोविंदराव भालेराव, अमोल घुमाडे, नाना ढगे, बंटी कसबे, श्रीनिवास एकुरकेकर, फैयाज डांगे, बिपिन जाधव, कपिल शेटकर, प्रीतम गोखले, सद्दाम बागवान, पप्पू अत्तर, संजय होनराव, श्रीकांत शिंदे इत्यादी तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. त्याबद्दल त्या सर्वांचे आभारही श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.