Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अहमदपूर सराफ आसोशिएशनच्या वतीने केली मतदान जनजागृती



दि.२ अहमदपूर प्रतिनिधी 


अहमदपूर सराफ आसोशिएशनच्या वतीने लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती व्हावी,मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सराफ आसोशिएशन व स्वीप पथकाच्यावतीने अहमदपूर येथिल सराफ दुकानातील सोने खरेदीच्या पावतीवर जागृत नागरिक होऊ या..अभिमानाने मत देवू या..!

वाढवू तिरंग्याची शान...

करु या देशासाठी मतदान..!

चला मतदान करु या..

लोकशाही रुजवू या..!वृद्ध असो किंवा जवान..सर्वजन करा अवश्य मतदान ..!असे घोषवाक्याचा स्टॅम्प वापरून केली जनजागृती.

      लोकशाहीतील या महाउत्सवात प्रत्येक मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याची गरज आहे.संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. दि.७ मे रोजी १००% मतदान करण्यासाठी अहमदपूर सराफ आसोशिएशनच्या वतीने आवाहन करण्यात आले.

     सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे यांच्यासह सराफ व सुवर्णकार आसोसिएनचे अध्यक्ष संतोष मद्देवाड सचिव गजानन कमठाणे,उपाध्यक्ष रवि मिरजकर,भरत इगे,सचिन करकनाळे,संजय गोटमवाड,प्रविण महामुणी,विनोद शिंगडे,मनोज करंडे,मधुकर आगलावे,बालाजी गादेवार,राम रत्नपारखे,संजम शहाणे,ओम कंधारकर,बडगीरे,किशोर पेड,परमेश्वर काळे,विश्वजीत बंगाली,सुभाष बंगाली,गजानन खेडकर आदिंची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवकुमार गुळवे तर उपस्थितीतांचे आभार स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे  यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.