Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आपले संविधान ठेवा त्याचा मान,लोकशाही बलवान करु चला. (स्वीप पथकाने मतदानाचा अभंगातून केली जनजागृती)



दि.०२ चाकूर प्रतिनिधी 

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती व्हावी,मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप कलापथकाद्वारे चाकूर व अहमदपूर विधनासभा मतदार संघात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष मोहिमेतून जनजागृती करण्यात येत आहे.दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी चाकूर तालुक्यातील शेळगाव येथे प्रबोधपर अभंगातून  शिवकुमार गुळवे यांनी मतदार बंधूना ७ मे रोजी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

  लोकशाहीतील या महाउत्सवात मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याची गरज आहे.संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तो केवळ हक्क नसून आपले कर्तव्य सुद्धा आहे.

असे खळुरे यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

      या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार,  शिवाजी पालेपाड,चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव,शिक्षणाधिकारी नागेश मापारी,गटशिक्षणाधिकारी जयसिंह जगताप,बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. 

     सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन  तेलंगे,बसवेश्वर थोटे,धनंजय नाकाडे यांच्यासह शेळगाव

बीएलओ विक्रम मुंढे,सोपान कोळी,रमाकांत तोगरेगे,प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग राजुरे,मनोज घुले,सोमनाथ पाटील,आशोक कस्तुरे,किशन सोनकांबळे, संग्राम काळोजी,गणेश पाटील , संगमेश्वर हवा,नवनाथ हेंगणे , राम सूर्यवंशी,दिगांबर सोनकांबळे गुणाजी माने,ईरप्पा पांचाळ,

यासह गावकरी मतदार बंधूची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्तविक महादेव खळुरे तर उपस्थितीतांचे आभार बसवेश्वर थोटे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.