उदगीर(एल.पी.उगीले) येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. एकूण 418 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा 100% निकाल लागला .
चि. संकेत कमलापुरे, कु. संध्या मदने, श्रद्धा कुलकर्णी व चि.बालाजी पाटील या विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त करून उज्वल यश प्राप्त केले आहे. विद्यालयाचा निकाल असा,100%---04 विद्यार्थी,95% गुण मिळवलेले विद्यार्थी 43, 90% गुण मिळवलेले विद्यार्थी 87,विशेष प्राविण्य मिळवलेले170 विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीत आलेले115 विद्यार्थी तर
द्वितीय श्रेणीत 46 विद्यार्थी आहेत.
या 100% उज्वल निकालाचे गमक संस्थेच्या नियोजनाप्रमाणे शाळेने विद्यार्थ्यांसाठी केलेले अविरत प्रयत्न आहेत. असे मुख्याध्यापक अंबादास राव गायकवाड यांनी नमूद केले. या प्रयत्नांमध्ये सुरुवातीपासूनच दहावीच्या मुलांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची 'समुपदेशन ' ही योजना राबविण्यात आली. नंतरच्या काळामध्ये तुकडीश: पालक मेळावे घेण्यात आले.
शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आणि पालकाच्या सतत संपर्कात असायचे. तसेच विषय शिक्षकांनी गृहभेटी दिल्या आणि त्यांच्या अभ्यासाची सखोल चौकशी केली. अशी माहिती मुख्याध्याक गायकवाड यांनी दिली.
तसेच संस्थेच्या नियोजनाप्रमाणे घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, दोन सराव परीक्षा, उत्तर पत्रिका वेळेवर तपासून विद्यार्थ्यांच्या मनातील शंकाचे समाधान करण्यात आल्याचे व कच्या मुलासाठी स्वतंत्र तासिका घेण्यात आल्याचे दहावी प्रमुख रामेश्वर मलशेट्टे यांनी सांगितले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार, कार्यवाह शंकरराव लासुणे,शालेय समितीचे अध्यक्ष सतनाप्पा हुरदळे , वसतीगृह अध्यक्ष षण्मुखानंद मठपती, बालवाडी विभागाच्या अध्यक्षा अंजलीताई नळगिरकर ,मुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार, श्रीपत सन्मुखे, माधव मठवाले,दहावी प्रमुख रामेश्वर मलशेटे, सहप्रमुख लक्ष्मी चव्हाण व दहावीचे सर्व वर्गशिक्षक ,विषय शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे .
