Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मी दिव्यांग मतदार,मतदानासाठी वेळ काढणार!-उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांनी दिव्यांग मतदार बांधवांना केले मार्गदर्शन


दि.३० अहमदपूर प्रतिनिधी 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणूकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने अहमदपूर तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.दि.२९ रोजी सायंकाळी थोरलेवाडी येथे दिव्यांग मतदारांची विशेष काळजी घेणे.मतदाना विषयी प्रोत्साहन देणे. त्या दृष्टीकोनातून प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिल चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.टपाली मतदान करू इच्छीणार्‍या दिव्यांगांना टपाली मतदानाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अशी माहिती सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे यांनी दिली.

     यावेळी तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी दिव्यांग असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा यावेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे.दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा.यासाठी शासनाने सर्व सोयी उपलब्ध करुन दिले आहे.

दिव्यांग मतदाराबरोबर थोरलेवाडीतील सर्व सुजान मतदारांनी येणाऱ्या ७ मे रोजी १००% मतदान करण्यासाठी आवाहन केले.

    या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर,तहसील कार्यालय अहमदपूर -चाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,सौ आर्चना माने,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे यांनी विविध लोकगीतातून जनजागृती केली.

थोरलेवाडीचे तलाठी नवनित जामनिक,अशोक वलसे,सत्यभामा वलसे,ज्ञानेश्वर वलसे,मोहन वलसे,ज्ञानोबा यरमे,                सुनंदा फुलमंटे,नारायण वाघमारे ,बालाजी फुलमंटे,आलाऊद्दीन किनीवाले,घुडूसाब शेख निवासी अपंग विधालय अहमदपूर या शाळेमधील संतोष नळगीरे,केशव श्रीराम,शंकर वाघमारे,अमोल पवार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिषष्ठित नागरीक गजेंद्र वलसे,पंढरी फुलमंटे  प्रकाश आरकीले,मछीद्रं वलसे,सचीन वलसे,माधव आरकीले,मदन दामले,दत्ता जगदाळे,संत तुकाराम महाराज कर्मशाळेतील मुख्याध्यापक संतोष पाळणे निवासी अपंग विद्यालय अहमदपूर येथिल बालाजी फुलमंटे,बालाजी वलसे,  गावातील दिव्यांग पुरूष  व महिला मतदार भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितीतांचे आभार बालाजी फुलमंटे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.