Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपनयन संस्कार कार्यक्रमात केली मतदान जनजागृती


दि.२९ (अहमदपूर प्रतिनिधी) 

     लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप कलापथकाद्वारे विशेष मोहिम राबविले जात आहे.दि.२९ रोजी  सकाळी पार्थ लॉन्स भगवान वाडी पाटी,शिरुर ताजबंद येथे पाटील परिवार बाभळदरा यांच्या उपनयन संस्कार या कार्यक्रमात तहसील कार्यालय अहमदपूर  स्वीप पथकाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली.

      उपनयन होणाऱ्या चिरंजीव अमेय,आदित्य,आरुष,आरव यांच्यासह पालक व पाहुणे मंडळींच्या हातात "मी मतदान करणार"अशा घोषवाक्याचे फलक देऊन पाहुण्यांसह स्वीप पथकाने केली मतदान जनजागृती.

        सुदृढ व निर्दोष व्यक्तीमत्व घडविण्यासाठी केलेला प्रयत्नपूर्वक विधी.प्रत्येक व्यक्तीचे जीवन आरोग्यपूर्ण, सुसंस्कृत,विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम,चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्तीमत्व निर्माण व्हावे.चांगल्या समाजरचनेची पायाभरणी व्हावी,एक चांगले व सुसंस्कृत,बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा या संस्कारां मागील प्रमुख उद्देश आहे.यातच राष्ट्रीय लोकउत्सवात प्रत्येक मतदार बांधवांनी मतदान कारावा.संविधानाने दिलेला हक्क ७ मे रोजी मतदान करुन बजवावा.असा संदेश देण्यात आला.

      या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार,  शिवाजी पालेपाड,चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव,शिक्षणाधिकारी नागेश मापारी,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,श्रीमती अर्चना माने,पुरुषोत्तम काळे यांच्यासह बाभळदरा येथिल ग्रामसेवक शिवानंद चिलरगे, प्रतिष्ठित नागरिक दैवशाला बिरादार, संदीप पाटील,अमर पाटील , राहूल पाटील ,सचिन पाटील ,पंकज मुरुळे ,दिगांबर बिरादार,शिरीष पाटील,

डाँ विठ्ठल पाटील,प्रविण डांगे,निरज मुरुळे,यासह गावकरी मतदार बंधूची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.