देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील सावरगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम तथागत शांतीदुत भगवान गौतम बुद्धांच्या व महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुष्पाने व धुपाने पुजन करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ संजय घोरपडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी डॉ घोरपडे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यानकोटी दिन दलितांचे उद्धार केले माणसाला माणूस पण दिले पवित्र अशा भारताला घटना दिली तेव्हा बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार केलेत हे कधीही फिटणार नाहीत अशी प्रतिपादन केले,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरे जी. डी सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडचे चवदार तळे व सत्याग्रह बाबत अनमोल मार्गदर्शन केले तसेच सायंकाळी चार वाजता गावातील प्रमुख रस्त्यावरुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या वेळी प्रदिप पाटील,रामचंद्र मसुरे,माजी सभापती मुरलीधर सुर्यवंशी, शाहिर डि एन कांबळे, चेअरमन पांडूरग बिरादार. व्यंकट बिरादार,शशुपाल कापडे,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, काशिनाथ मुंगे, अशोक सुर्यवंशी,अंगणवाडी कार्यकर्ती शेषीकला बिरादार, वर्षा गिरी, निर्मला मसुरे,जयंती समितीचे अध्यक्ष मिलीद कांबळे,उपाध्यक्ष संदीप मुंगे,सचिव सत्यवान सुर्यवंशी, अजित मुंगे, राजकूमार मसुरे, भिमराव बनसोडे,भिम बोरे, किरण तेलग, राजेंद्र वाघमारे, वैजनाथ सुर्यवंशी, छाया मुंगे, शांताबाई कांबळे, सुप्रीया मुंगे, रेखा सूर्यवंशी, देवशाला बनसोडे, प्रियंका कांबळे भाषणातून मनोगत व्यक्त केले तसेच सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन लक्ष्मण रणदिवे व आभार बालाजी कांबळे यांनी केले,
