उदगीर (एल. पी. उगिले)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व्यंकटराव नामदेवराव पाटील अव्वलकोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्यासोबत राहून, उदगीर तालुका आणि परिसरामध्ये सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम व्यंकटराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला होईल. अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदाचे निवड पत्र देताना त्यांनी स्पष्ट केले आहे की, पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ही निवड केली जात असून पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, पक्षाचे ध्येय धोरण तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवण्याचे कामही आपण कराल, अशी ही अपेक्षा सदरील नियुक्ती पत्रात केली आहे.
एका ज्येष्ठ आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या नेत्याची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच उदगीर शहराध्यक्ष अजीम दायमी, महेश मठपती, शंकरराव मुक्कावार, उदगीर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, जळकोट शहराध्यक्ष बसवराज काळे, रविशंकर बिरादार, संदीप धुमाळे, अमरनाथ मुर्के, बसवराज पाटील इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
