उदगीर (एल.पी.उगीले)
जीवन प्रयाग फाउंडेशनच्या वतीने स्व.अरुंधती ददापुरे यांच्या स्मरणार्थ उपजिल्हा रूग्णालय, उदगीर येथे खिचडी वाटप करण्यात आले.
आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिपरत्वे आपण काहीतरी देणे लागतो, हेच देणे आणि त्याची कृतज्ञता लक्षात घेऊन स्व.अरुंधती ददापुरे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाचे नातेवाईक,कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना खिचडी वाटप करण्यात आली.
जीवन प्रयाग फाऊंडेशन ही सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक भान विचारात घेऊन कार्य करत असते. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संस्था आणि संस्थेचे पदाधिकारी समाजकार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. खिचडी वाटपाच्या वेळी जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी,अक्षय ददापुरे,नितीश शिरशे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
