उदगीर (एल.पी.उगीले) येथील ललित कलांना समर्पित असलेल्या संस्कार भारती या राष्ट्रिय संधटनेच्या वतीने २२ एप्रील हा दिवस भू अलंकरण दिवस प्रतीवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला. संस्कार भारती समिती च्या उदगीर शाखेने हा दिवस येथील टाईम्स पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. या शाळेतील शिक्षिका सौ.काव्या सौथ, सौ. सावंत व विद्यार्थिनींनी संस्कार भारतीची भव्य रांगोळी या दिनाचे औचित्य साधून शाळेत काढली होती. संस्कार भारती समिती उदगीर चे कार्यकारिणी सदस्य डॅा. राहूल अलापूरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संस्कार भारती, भू अलंकरण दिवस आणि वसुंधरा दिनाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी टाईम्स पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक अभिजीत नळगीरकर, शाळेतील शिक्षकवृंद , विद्यार्थी, संस्कार भारतीचे डॅा. संजय कुलकर्णी, डॅा. सौ. दिपाली कुलकर्णी व संस्कार भारती समिती उदगीर चे सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर व संस्कार भारती समिती तर्फे शिक्षिका व विद्यार्थिनींना यथोचित सन्मान करण्यात आला.
