चाकूर (प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ आष्टा मोड येथिल टोल नाक्यावर लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी नाक्यावरील कर्मचारी रस्त्यावरील वाहन चालक यांना दि.७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कलापथाकाने घोषवाक्य पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती केली.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने संबंध देशात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप पथकाद्वारे विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, अहमदपूरचे सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार शिवाजी पालेपाड,नरसिंग जाधव, शिक्षणाधिकारी नागेश मापारी,यांच्या आदेशानुसार लातूर लोकसभा मतदारसंघात जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम यशस्वीपणे उपक्रम राबविले जात आहेत.यासाठी स्वीप पथकात उपक्रमशील कलाशिक्षक बांधवांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा महाराष्ट्रातील महामार्ग आहे. हा महामार्ग तुळजापूर पासून बुटीबोरी(नागपूर) जातो.या महामार्गावर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ,वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील मतदार बांधव या रस्त्यावर प्रवास करीत आहेत.
प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून देणे,मतदान करण्यासाठी प्रेरित करणे,लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.मतदार जनजागृती साठी घोषवाक्याचे फलक घेऊन महामार्गाच्या टोल नाक्यावरील दोन्ही बाजूला थांबून स्वीप सदस्यांनी जनजागृती केली.
सदरील उपक्रमासाठी स्वीप पथक प्रमुख राज्यपुरस्कार प्राप्त कलाशिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,श्रीमती अर्चना माने,बस्वेश्वर थोटे,प्रमोद हुडगे,आष्टा मोड टोल नाका येथिल कर्मचारी दिपक सापनेर,बापू केंचे,सय्यद अक्तर,राजीव शेख,माऊली भिमाळे,नवनाथ बोयने,आदिंची उपस्थितीत होती.
