उदगीर (एल पी उगिले)
सध्या समाजामध्ये विकृत मानसिकता वाढीस लागले आहे. याला बऱ्याच प्रमाणात समाजच कारणीभूत आहे. नैतिकतेचे धडे योग्य वेळेत, योग्य वयात विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजेत. जगामध्ये भारतीय संस्कृती आदर्श आहे. त्या संस्कृतीचा हात धरून नव्या पिढीला पुढे चालवले पाहिजे, तेव्हाच स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रीशक्ती मध्ये जागृती निर्माण होऊ शकेल. संस्कारक्षम मुले घडवणे हे समाजातील सर्वच आई म्हणून जबाबदारी उचलणाऱ्या महिलांची आहे. स्त्री शक्ती जागृत करण्याच्या दृष्टीने महिलांनी आपले कर्तव्य ओळखावे आणि बालकांमध्ये अध्यात्म आणि संस्कृती संवर्धना बरोबरच वाचन संस्कृती जोपासण्याचे धडे द्यावेत. असे विचार डॉ. सुरेखा गुज्जलवार यांनी व्यक्त केले. त्या लिनेस क्लब उदगीरच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
या पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लातूर येथील कोऑर्डिनेटर डॉ. साधना पळसकर या होत्या.
प्रथमतः मान्यवरांचा सत्कार स्वागत झाल्यानंतर सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक लिनेस क्लबच्या नूतन अध्यक्ष राचम्मा मळभागे यांनी केले.
याप्रसंगी लिनेस ऍड दिपाली औटे, सौ. अनुराधा धोंड, सौ. अनिता शानेवार, समाज रत्न सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेत्या डॉ. सुरेखा गुजलवार, जयश्री स्वामी आचार्य इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत लिनेस क्लब पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
लीनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणून राचम्मा मळभागे यांची तर सचिव म्हणून सौ अनिता शानेवार, सहसचिव म्हणून सौ जयश्री स्वामी आचार्य यांची निवड करून त्यांना लिनेस क्लबच्या समाजकार्य संदर्भात शपथ देण्यात आली.
प्रमुख अतिथी तथा या पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षा साधनाताई पळसकर यांनी स्त्रियांनी आपला संसार सांभाळून समाजकार्य कशा पद्धतीने करावे ? व लेनेस क्लबच्या माध्यमातून समाजकार्य कसे चालते? याची सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जयश्री स्वामी आचार्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. अनिता शानेवार यांनी केले.
